मॊहित पाठक(गुरूजी) 9822397570
बोडण

कोकणस्थ ब्राह्मणांतील सर्वात महत्वाचा कुलाचार म्हणजे बोडण .

     सर्वच कोकणस्थ ब्राह्मणांत बोडण हा विधी आहे असे नाही काही जणांकडे बोडण आहे तर काही जणांकडे गोंधळ हा विधी कुलाचार म्हणून केला जातो . आपल्या घरातील वरिष्ठ मंडळींना आपल्या घरात कोणता कुलाचार आहे हे माहिती असतेच त्यांच्या कडून आपण आपल्या घरात बोडण आहे का गोंधळ आहे या बाबत माहिती घेऊ शकता .

बोडण साहित्य :-


     हळद , कुंकू , अक्षता , सुपारी 10 नग , विड्याचे पान 4 , दूध , दही , तूप , मध , साखर , कणकेचे अलंकार , अत्तर , गरम पाणी , एकत्रित पंचामृत , गूळ , खोबरे , सुट्टी फुले , कापूर , उदबत्ती , तेलाच्या वाती 2 नग , तुपाच्या वाती 2 नग , मोठी परात (तांब्याची किंवा पितळेची) , आगपेटी , निरांजन 2 नग , ओटीसाठी तांदूळ , पेला , पळी , ताम्हण , नारळ 5 नग , सहा नैवेद्य ( पाच बोडणाचे व एक महानैवेद्य )

    सुवासिनींना ओटी भरल्यावर त्यांना आपल्या इच्छेनुसार दक्षिणा किंवा वस्तू (पर्स,ब्लाउज पिस, इ.) आपल्या इच्छेनुसार देतात .

    कुमारिकेची ओटी भरल्यावर त्यांनाकाही जण कापड देतात किंवा काही जण दक्षिणा देतात हे सुद्धा आपल्या इच्छेनुसार आपण देऊ शकता.

आपण आता बोडण या विधी विषयी माहिती घेऊ


    कुटुंबात शुभवृद्धी झाल्यावर म्हणजेच मंगलकार्य किंवा प्रसूती झाल्यावर बोडण भरण्याची प्रथा आहे याला कार्याचे बोडण म्हणतात व काही कुटुंबात दरवर्षी बोडण भरण्याची प्रथा आहे (वर्ष भरात आपल्या घरात काही कार्य होऊ अथवा न होऊ आपल्या दर वर्षी बोडण भरावेच लागते ) याला वार्षिक बोडण असे म्हणतात .

    गौरीहराच्या वेळी पूजिलेली अन्नपूर्णा देवी (पार्वती) नववधू आपल्या बरोबर पतिगृही आणते . ही देवी कुलवधू वर कृपादृष्टी ठेवून तिची संकटे निवारते आणि तिचा संसार वाढीस लावते या श्रद्धे मुळे वंशवृद्धी झाल्यावर त्याची सांगता म्हणून बोडण भरण्याची चाल आहे . बोडण या विधी साठी पूजावयाची देवी म्हणून माहेरहून आणलेल्या अन्नपूर्णा देवीस विशेष स्थान असते . घरातील मुख्य सुवासिनी , स्त्री किंवा नववधू , तसेच कुटुंबाबाहेरच्या मुलंबाळं असलेल्या तीन ब्राह्मण सुवासिनी व एक कुमारिका अशा पाच स्त्रियांनी मिळून बोडण भरावयाचे असते . सुवासीनी घरी आल्यावर सर्व प्रथम तुळशीवृंदावना जवळ त्याना उभ्या करून प्रथम तुळशीची दूध-पाणी घालून पूजा करण्यात येते . नंतर बाहेरच्या तीन सुवासिनी व कुमारिका यांच्या पायावर दूध - पाणी घालुन त्यांची पाद्य पूजा करून घ्यावी व त्यांचे औक्षण करून त्यांचे स्वागत करावे .

    बोडणाची जागा स्वच्छ पुसून घ्यावी तेथे बोडणाची विशेष रांगोळी काढून त्यावर पुजेचा पाट ठेवावा . पाटावर अक्षदा ठेवून त्यावर बोडण कालवण्याची परात ठेवावी . घरची सुवासिनी देवीला बसण्यासाठी व टेकण्यासाठी कणकेचे हळद घालून भिजवून बैठक , लोढ (पाटा-वरवंटा) तयार करून ते परातीत ठेवतात . देवीला घालण्यासाठी कणकेचे अलंकार करतात .तसेच आरतीसाठी पाच दिवे व पाच जणींना वाहण्यासाठी भंडारा तयार करतात .

    नंतर देवीची मूर्ती परातीत एका बाजूला ठेवावी . देवीची पुजा करण्यापूर्वी सुपारीच्या गणपतीची परातीत स्थापना करून त्याची पूजा करून घ्यावी नंतर देवीची पूजा करावी . अन्नपूर्णा देवीला सहा नैवेद्य अर्पण करतात , त्यातील पाच नैवेद्य लहान पानावर किंवा छोट्या पुरणपोळी वर वाढावेत . नैवेद्याला पुरण , भजी किंवा वडे आणि खीर हे पदार्थ असतात . पाच नैवेद्य देवीपुढे परातीत ठेवतात व एक नैवद्य परातीबाहेर दाखवितात हा नैवेद्य कुमरिकेस किंवा बोडणासाठी बसलेल्या घरच्या सुवासिनीस व त्यांच्या घरच्यांना भोजनास प्रसाद म्हणून देतात. नैवद्य दाखवून झाल्यावर कणकेचे बनवलेले दिवे लावून ताम्हणात ठेवतात , सुवासिनी व कुमारिका अन्नपूर्णा देवीला हळद कुंकू वाहून पूजा करतात व पाचजणी दिव्यांचे ताम्हण हातात धरून अन्नपूर्णा देवीची आरती करतात . बोडणाची आरती ही वेगळी असती ती आपल्याला खालील बाजूस मिळेल .

    आरती झाल्यावर हे पाच दिवे परातीत ठेवलेल्या पाच नैवद्य च्या पानावर ठेवतात . नंतर घरातील अगर कोणीही सुवासिनी कुमारिकेसह पाच जणींच्या हातावर पंचामृत घालतात . पंचामृत घालताना खालीलक्रमाणे पंचामृत घालावे व सर्वप्रथम दिवे शांत करावे . पंचामृत चा क्रम :- दूध , दही , तूप , मध , साखर दिवे शांत झाल्यावर देवीवर आणखी पंचामृत घालून सर्वजणी परातीतील देवीसह बोडण म्हणून एकत्र कालवतात.

    बोडण कालवत असतात "देवी तृप्त झालीस का ?" किंवा "पंचामृतातील कोणता पदार्थ पाहिजे ? "असे ही कुमरिकेस विचारतात , कुमारिका होय असे म्हणेपर्यंत बोडणात पंचामृतातील मागेल तो पदार्थ घालून बोडण कालवतात .बोडणास बसताना घरच्या सुवासिनी चे तोंड पूर्व दिशेला असते . कुमारिका तिच्या उजव्या बाजूस बसतात . देवी तृप्त झाल्यावर त्या कालवलेल्या बोडणाचा काही भाग देवीचा प्रसाद किंवा बोडणाचा प्रसाद म्हणून कुमारिकेच्या हाताने काढून ठेवतात . हाच अंगारा म्हणून कुटुंबातील सर्व मंडळीस लावतात . घरातील सर्व मंडळींनी बोडण चालू असताना येऊन नमस्कार करावा . बोडण हा विधी दुपारी 12 च्या आत पूर्ण करणे गरजेचे असते .

    नंतर बोडणातील अन्नपूर्णा देवी बाहेर काढून तिला पुरण लावून स्वच्छ धुवून-पुसून तिच्या तोंडाला साखर लावुन ती जागेवर ठेवावी .कालविलेल्या बोडणाचा कोणताही भाग अपवित्र ठिकाणी पडू नये म्हणून सुवासिनी व कुमारिका आपले हात त्याच परातीत हाताला पुरण लावून थोड्या गरम पाण्याने धुऊन घ्यावे . नंतर ते सर्व कालवण अंबामाता समजून गाईला खावयास घालतात किंवा ते देवीला पोहोचावे या इच्छेने वाहत्या पाण्यात विसर्जित करतात . त्यायोगे आपली सेवा देवीपाशी रुजू झाली असे मानतात , यानंतर सुवासिनिंची व कुमारिकेची ओटी भरून सर्व मंडळी भोजनास बसतात . वरील माहिती श्रीकृष्ण ल. टिळक यांच्या चित्पावन दर्शन पुस्तकातून साभार घेतली .

सर्वात महत्वाचे म्हणजे बोडण कोणत्या महिन्यात करावे व कोणत्या महिन्यात करू नये याबाबत अनेक शंका आहेत . त्याचे निरसन आपण करून घेऊ , काही कोकणस्थ ब्राह्मण यांच्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे बोडण चातुर्मास , चैत्र व पौंष महिन्यात करत नाहीत . संदर्भ :- चित्पावन दर्शन , लेखक श्री. श्रीकृष्ण ल.टिळक
सध्या सर्व मान्य पंचांग आपण मानतो ते म्हणजे दाते पंचांग त्यामध्ये असा उल्लेख आहे की बोडण हा विधी कोणत्याही महिन्यात , कोणत्याही तिथिला , कोणत्याही वारी करण्यास हरकत नाही . फक्त एकादशी व अमावस्या या दोन तिथी रोजी बोडण करता येत नाही . (दाते पंचांग पान क्र. 107 वर आपणास माहिती मिळेल)* घरात गर्भवती स्त्री असल्यास बोडण हा विधी केला जात नाही .

s

    बोडण हा विधी आपल्याला घरी करणे शक्य नसल्यास आपण तो स्वतः अंबाजोगाई येथे येऊन करू शकता किंवा आपल्याला येणे शक्य नसल्यास आपल्या प्रित्यर्थ बोडण करून त्याचा अंगारा प्रसाद आपणास घरपोच पाठवण्याची सोय उपलब्ध आहे . त्यासाठी खालील नंबर वर संपर्क साधावा .

    बोडणाची सोय केली जाते .


टिप : वरील कोड स्कॅन करून जर आपण पेमेंट करणार असाल तर खालील गोष्टी काळजीपूर्वक पाहाव्या व पेमेंट करावे.

१) कोड स्कॅन केल्यावर आपल्या मोबाईल स्क्रीन वर मोहित दीपक पाठक असे नाव आले आहे का ते चेक करावे व कन्फर्म करून पेमेंट करावे.

मोहित दिपकराव पाठक (गुरूजी)

अंबाजोगाई जि:- बीड 431517


होम

कथा

कुलधर्म कुलाचार माहिती

विविध सेवा / विधी माहिती

नवरात्र व जन्मोत्सव माहिती

बोडण माहिती

दैनंदिन उपासना व आरती

प्रेक्षणीय स्थळे

सहल माहिती

फोटो

संपर्क