![]() ![]() |
![]() |
|
![]() |
वे.शा.स.कै.काशिनाथ देविदासराव पाठक यांनी सर्व प्रथम श्री. योगेश्वरी मातेची सेवा करण्यास सुरुवात केली व अंबाजोगाई येथील क्षेत्र उपाध्याय व कोकणस्थ ब्राह्मणांचे उपाध्याय म्हणून त्यांची ओळख झाली. श्री. योगेश्वरी देवी ची अखंड सेवा त्यांनी स्वतः त्यानंतर त्यांच्या मुलाने व सध्या त्यांच्या नातवाने आजतागायत अव्याहतपणे सुरूच ठेवलेली आहे .
अंदाजे मागील 100 वर्षांपूर्वी मोजक्याच कोकणस्थ ब्राह्मण लोकांना हे माहिती होत की आपली कुलस्वामिनी हि श्री.योगेश्वरी देवी , अंबाजोगाई येथे आहे . बऱ्याच कोकणस्थ लोकांना आपली कुलस्वामिनी कोणती आहे हे माहिती नव्हते ही बाब आमच्या आजोबांनी लक्षात घेतली व तेव्हा आमच्या आजोबांनी(कै.वे.शा.सं. काशिनाथ देविदास पाठक) एक अनोखा उपक्रम हाती घेतला व त्यानी जवळपास सर्व कोकण परिसर व पुणे शहर मधील त्यांच्या ओळखीच्या लोकांशी संपर्क करून त्यानी सर्व कोकणस्थ ब्राह्मण लोकांशी संपर्क केला व त्यांच्या कुलदेवी बद्दल त्याना माहिती देऊ लागले व तिथून खऱ्या अर्थाने श्री. योगेश्वरी देवी हि कोकणस्थ ब्राह्मणांची कुलस्वामिनी आहे असे सर्व लोकांना माहिती होऊ लागले व अंबाजोगाई येथे ते आपल्या कुलस्वामिनी च्या दर्शनासाठी सहकुटुंब सहपरिवार येऊ लागले . थोडक्यात म्हणजे श्री. योगेश्वरी देवी हि जवळपास 95 % कोकणस्थ ब्राह्मणांची कुलस्वामिनी आहे याचा प्रचार व प्रसार कै. वे.शा.सं. काशिनाथ देविदास पाठक यांनी त्यांच्या काळात केला . आपल्यापैकी जे कोणी वयस्कर असतील त्याना माहिती सुद्धा असेल की काशीनाथ पाठक त्यांच्या घरी येऊन गेलेले आहेत .
श्री. योगेश्वरी देवी मंदिरात क्षेत्र उपाध्याय म्हणून काम करणारे पाठक घराणे सर्वात जूने घराणे म्हणून ओळखले जाते . 2001 साला पूर्वी जे कोणी लोक अंबाजोगाई येथे येऊन गेलेले आहेत त्यांना माहिती आहेच की ,त्या काळी अंबाजोगाई येथे आल्यावर सगळी सोय ही पाठक गुरूजी यांच्या घरीच घरगुती पद्धतीने होत असे व आज सुद्धा होते . तेव्हा अंबाजोगाई येथे यात्री निवास , भक्त निवास , वगैरे काहीही नव्हते . अभिषेक , महानैवेद्य , सुवाष्ण , ब्राह्मण , कुमारिका , बोडण , दुपारचे प्रसादाचे पुरणपोळी चे जेवण सुद्धा सगळी सोय आपल्या घरीच केली जायची व आजतागायत तशीच सगळी सेवा अव्याहतपणे सुरू आहे .
काळानुरूप मंदिरातील गुरुजींची संख्या वाढली व पाठक गुरूजी या नावाचा दुरूपयोग सुरू झाला . आम्हीच पाठक , त्यांच्या पैकी कोणी करत नाही वगैरे असे कारणे सांगून खोटा अपप्रचार करण्यात येतो असे बरेच अनुभव आम्हाला सांगण्यात आले . त्यामुळे शक्यतो अंबाजोगाई ला येताना आधी गुरुजींना फोन करावा किंवा मंदिरात आल्यावर मोहित पाठक गुरूजी असे विचारावे .
सन 2004 साली वे.शा.स. काशीनाथ देविदास पाठक यांचे वृद्धपकाळाने निधन झाले . काशिनाथ पाठक यांचे निधनाच्या वेळी 94 वर्ष वय होते . त्यांच्या पश्चयात त्यांचा मुलगा श्री. दिपक काशिनाथ पाठक यांनी त्यांचे कार्य पुढे चालू ठेवले . दिनांक 6 फेब्रुवारी 2016 रोजी श्री. दिपक काशिनाथ पाठक यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले त्यांचे वय अवघे 48 वर्षांचे होते . त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा श्री. मोहित दिपक पाठक सध्या अंबाजोगाई येथे सर्व कामकाज पाहत आहे .
टिप : वरील कोड स्कॅन करून जर आपण पेमेंट करणार असाल तर खालील गोष्टी काळजीपूर्वक पाहाव्या व पेमेंट करावे.
१) कोड स्कॅन केल्यावर आपल्या मोबाईल स्क्रीन वर मोहित दीपक पाठक असे नाव आले आहे का ते चेक करावे व कन्फर्म करून पेमेंट करावे.