अश्विन शुद्ध प्रतिपदा पासून अश्विन शुद्ध दशमी पर्यंत हे नवरात्र साजरे केले जाते . अश्विन शुद्ध प्रतिपदा रोजी आपल्या घरातील प्रथेनुसार आपल्या घरातील देवघरात घट स्थापना करून घ्यावी . नवरात्र काळातील दररोज ची घट माळ , आरती , देवपूजा नित्यनेमाने करावी .
अश्विन शुद्ध अष्टमी / नवमी कुलाचार ( आपल्या घरातील प्रथेनुसार अष्टमी का नवमी आपण ठरवावे व कुलधर्म कुलाचार करावा .)
कुलधर्म कुलाचार :- घरातील श्री. योगेश्वरी मातेच्या मूर्तीस / टाकास / फोटोस श्री.सुक्ताचा अभिषेक करून सोवळ्यात पुरणा-वरणाचा स्वयंपाक करून श्री.योगेश्वरी मातेस व आपल्या देव घरातील देवांना महानैवेद्य दाखवावा त्यानंतर सुवाष्ण ब्राह्मण व कुमारिका यांना भोजन द्यावे व त्याना यथाशक्ती दक्षिणा द्यावी.
हे नवरात्र नाही हा योगेश्वरी मातेचा जन्मोत्सव असतो त्यामुळे या उत्सव काळात घट वगैरे बसवण्याची पद्धत नाही . फक्त जन्मोत्सव काळात देवासमोर / श्री. योगेश्वरी मातेच्या फोटो समोर तेलाचा अखंड नंदादीप लावावा व मार्गशीर्ष शुद्ध पौणिमा रोजी कुलधर्म कुलाचार करावा . या जन्मोत्सव काळात योगेश्वरी मातेची शक्य तेवढी जास्त सेवा आपण करावी.
जन्मोत्सव कालावधी हा मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी ते मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा हा असतो .
वरील दोन्ही कुलधर्म कुलाचार करणे आवश्यक आहे .